रावेर तालुक्यात सुरेश धनके यांच्यावर जबाबदारी

रावेर : प्रतिनिधी । आज नाथाभाऊ यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रावेर भाजपा कार्यालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे विषयावर मंथन सुरु होते. अद्यापही रावेर तालुक्यातील एकाही भाजपा पदाधिकारी किंवा लोकप्रतिनीधीनी आपली भूमिका अजुन स्पष्ट केली नाही

रावेर तालुक्यात भाजपा खिंडार पडू नये याची जबाबदारी पक्षाने भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके यांच्यावर सोपवली असून. श्री धनके प्रत्येक पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या संर्पकात आहे.रात्री उशिरा पर्यंत पदाधिकारी भाजपा कार्यालयात ठाण मांडून होते.

रात्री उशिरापर्यंत रावेर भाजपा कार्यालयात महत्वाच्या पदाधिका-यांचे नाथाभाऊ विषयावर मंथन सुरु होते. नाथाभाऊ शुक्रवारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.

यामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर ,
सरचिटणीस महेश चौधरी, उपसभापती जुम्मा तडवी, पी के महाजन, संदीप सावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content