यावल येथे तरुणाकडून वयोवृद्ध महिलेचा विनयभंग

yawal police station

यावल, प्रतिनिधी | शहरातील एका तरुणाने वयोवृध्द महिलेचा विनयभंग केल्याची घटना येथे घडली असुन या संदर्भात महिलेच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्राकंडुन मिळालेली माहिती अशी की, शहरातील भवानी पेठ या परिसरात राहणाऱ्या गणेश अरुण कोळी याने काल (दि.२४) रात्री ९.०० वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका ८० ते ८५ वर्षे वयाची एक वृद्ध महिला आपल्या घरापासुन काही अंतरावर नगर पालिकेच्या सार्वजनिक ठिकाणी लघुशंकेसाठी गेल्या असता आरोपी गणेश याने त्या महिलेचा विनयभंग केला.

याबाबत महिलेने फिर्याद दिल्यानुसार भाग ५ गु .र .न .१८/२०२०प्रमाणे भा .द .वि .३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास हे.कॉ. नितिन खुबचंद चव्हाण व हे.कॉ. मेहबुब इमाम तडवी हे करीत आहेत.

Protected Content