डॉ. प्रशांत सरोदे यांना लघुउद्योगचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर 

WhatsApp Image 2020 01 25 at 5.12.47 PM

रावेर, प्रतिनिधी |चिनावल येथील महालक्ष्मी बायोजीनिक्सचे संचालक डॉ. प्रशांत सरोदे यांना जळगाव जिल्हा लघूउद्योग क्षेत्राचा सन २०१७ चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनी जळगाव येथे त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना हा पुरस्कार राज्याच्या उद्योग संचलनालयातर्फे दिला जातो. रविवारी प्रजासत्ताक दिनी (दि.२६ ) जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. प्रशांत सरोदे यांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे. यावेळी खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. स्मिता वाघ, आ.चंदुलाल पटेल, आ. गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे, आ. चिमणराव पाटील, आ. लता सोनवणे, आ. किशोर दराडे, आ. संजय सावकारे, आ. किशोर पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. अनिल पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे ,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.  पुरस्कार मिळवणारे डॉ. सरोद हे मुळचे चिनावल येथील रहिवाशी असून त्यांनी इंडस्ट्रीयल मैक्रोबायोलॉजी या विषयातून विशेष प्राविण्य मिळवले आहे. तसेच केळी, कापूस, गहू, हरबरा या पिकांवर होणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंचा होणारा परिणाम यावर संशोधन करीत त्यांनी पीएच. डी. प्राप्त केलेली आहे. २०१७ पासून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ते राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

Protected Content