नविन साठवण तलाव उभारणीत भ्रष्टाचार; चौकशीसाठी भाजपाचे साखळी उपोषण

यावल प्रतिनिधी | जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून भष्ट्राचारात सहभागी असलेल्यांवर कार्यवाही करावी या मागणीकरिता तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरू करण्यात आले आहे.

यावल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज गुरुवार, दिनांक ९ डिसेंबर रोजी यावल येथील तहसील कार्यालयासमोर यावल नगर परिषदच्या माध्यमातुन सुमारे १ कोटी ८० लाख रूपये निधीच्या खर्चातुन नवीन साठवण तलावाची उभारणी करण्यात आली आहे. या कामात मोठया प्रमाणावर भ्रष्ठाचार झालेला असून या संदर्भात सर्वप्रथम यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे.

भाजपच्या या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी सदर भ्रष्ठाचाराप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून ३० दिवसाच्या आत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहेत. तथापी नगर परिषद यांनी साठवण तलाव कामाचे बिल व डिपोजिट अदायगी केली असल्याचे कळाले असून या कामात अनियमितता करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला.

या कामाच्या चौकशी समितीने अदयाप नगर परिषदेला कोणतेच चौकशी कामी आदेश दिलेले नाहीत. भ्रष्ठाचारात सहभागी असणाऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉ .कुंदन फेगडे, भाजपाचे यावल शहराध्यक्ष निलेश गडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, भाजयुवा मोर्चाचे रितेश बारी, शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश चौधरी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राऊल बार , शहर सरचिटणीस परेश नाईक, अॅड गोविंद बारी, गोपाळसिंग पाटील, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे यांनी या साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे .

Protected Content