एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटाच्या आठ मंत्र्यांवर आज नवीन जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर केवळ १८ मंत्र्यांचेच खातेवाटप करण्यात आलं आहे. दरम्यान, अधिवेशन सुरु होण्याअगोदरच शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे या अतिरिक्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अशी आहे अतिरिक्त जबाबदारी

उदय सामंत माहिती आणि तंत्रज्ञान

अब्दुल सत्तार आपत्ती व्यवस्थापन

दीपक केसरकर- पर्यावरण व वातावरणीय बदल

शंभूराज देसाई- परिवहन

दादा भूसे- पणन

संजय राठोड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

तानाजी सावंत- मृद व जलसंधारण

संदीपान भुमरे- अल्पसंख्याक व औकाफ

दरम्यान, ही जबाबदारी म्हणजे खात्यांचा अतिरिक्त प्रभार नसून ती पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीपुरती असल्याचे एकनाथ शिंदे यांनी याबाबत जारी करण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे. आजपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Protected Content