फैजपूरातील दोघां कोरोना पॉझिटिव्ह यांच्या संपर्कातील तिघांचे तपासणी अहवाल पाठविले

फैजपूर, प्रतिनिधी । शहरात काल सिंधी कॉलनी परिसरातील दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील ३ जणांचे तपासणी अवाहल तपासणीसाठी आज पाठवण्यात आलेले आहे. या तीन पैकी एका डॉक्टरांचा समावेश आहे.

सिंधी कॉलनी परिसरातील अहमदाबाद येथून आलेले रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने फैजपूर शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. या रुग्णांची तपासणी अहवाल काल गुरुवारी सायंकाळी दाखल होताच प्रशासनाने काल रात्री पासूनच सिंधी कॉलनी परिसर सील करण्याचे काम सुरू केले होते. आज शुक्रवारी शहरात एक तरुण संशयित म्हणून मृत्यू झाला असल्याने त्या तरुणाचा व त्याच्या वडिलांचा तपासणी अवाहल घेऊन तपासणी विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. एकंदरीत शहरात ५ नागरिकांचे स्वॅब अहवाल घेऊन पाठवण्यात आले आहे. तर ६ लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. आज प्रशासनातर्फे पूर्ण खबरदारी घेऊन ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्या भागातील संपूर्ण एक किलोमीटरचा परिसर पालीका प्रशासनाने पूर्ण सील केला आहे जेणेकरून बाहेरील नागरिक आत प्रवेश करणार नाही किंवा आतील नागरिक बाहेर जाणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. यासाठी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी किशोर चव्हाण, एपीआय प्रकाश वानखडे, सर्कल जे. डी. बंगाळे हे चोक काम बजावत आहे.

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
गेले दोन महिन्यापासून प्रशासन वारंवार सांगत आले की विनाकारण घराच्या बाहेर निघू नका. मास्कचा वापर नियमितपणे करा मात्र या सुचनाकडे नागरीक हेतुपुरस्कार दुर्लक्ष करीत होते. मात्र दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले.

Protected Content