वाघझीरा आदिवासींची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; यावल बीडीओंना निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझीरा या आदीवासी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवा या मागणीचे निवेदन हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “यावल तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझीरा मालोद ग्रुप ग्रामपंचायत असून, हे दोघ गावात आदीवासी बांधव राहत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वांनी नळजोडणी केलेली आहे. परंतू नळाला पाणीच येत नाही अशी तक्रार देण्यात आली. गावात एकच सार्वजनिक विहिर आहे. त्यात अत्यंत घाण पाणी आहे. त्यामुळे अशा आदीवासी बांधवांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेवून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीचे निवेदन यावल पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्ताराधिकारी किशोर सपकाळे यांना देण्यात आले.”

याप्रसंगी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सरोदे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, तुषार पाटील, दिपक तेली, पंकज हिवराळे, गौतम कोळी, समाधान महाजन, प्रमोद जाधव, विश्वास पाटील, भरत बडगुजर यांच्यासह असंख्य आदीवासी बांधव उपस्थित होते.

Protected Content