रमजान, अक्षयतृतीयेच्या खरेदीसाठी दुकाने उघडा

जळगाव प्रतिनिधी । अक्षयतृतीया आणि रमजान सणानिमित्त १४ मे पर्यंत इतर दुकाने सुरू ठेवण्याची मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्षय तृतीय आणि रमजान ईद हे दोन सण येत्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. सण असल्यामुळे  नागरीकांना सणासाठी विविध वस्तू खरेदी करण्यावच्या असतात. मात्र सध्यास्थितीत फक्त जीवनावश्यक वस्तूंतीच दुकाने सुरू असल्याने सणासाठी लागणाऱ्या वस्तू मिळत नाही. त्यामुळे ईदनिमित्त कापड दुकान, सुकामेवा व पादत्राणे दुकाने, वर्षश्राध्द सह इतर दुकाने ११ ते १४ मे पर्यंत सकाळी ७ ते ११ वाजेच्या कालावधीत सुरू ठेवण्यात यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची स्वाक्षरी आहेत. निवेदन देतांना नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजरी, माजी नगरसेवक सुनिल माळी यांची उपस्थिती होती.

Protected Content