खानापूर येथे झेरॉक्स दुकान फोडले; ९३ हजाराचा मुद्देमाल लांबविला

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील खानापूर येथील बसस्थानकाजवळील झेरॉक्सचे दुकान फोडून दुकानातील २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शेख फारूख शेख शरीफ (वय-५०) रा. खानापूर ता. रावेर यांचे गावातील बसस्थानकाजवळ झेरॉक्स व पंक्चर काढण्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे २० जानेवारी रोजी त्यांनी रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी झेरॉक्सचे दुकान फोडून दुकानातील ८ हजार रूपये किंमतीचे झेरॉक्स मशीन, १० हजार रूपये किंमतीचे ट्यूब टायर व ५ हजार रूपये किंमतीचे सर्वो आईलच्या बाटल्या असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश चौधरी करीत आहे.

Protected Content