भुसावळात घरासमोरून दुचाकीची चोरी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील खडका रोडवरील एकाची घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल लांबविल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेख इकबाल शेख उस्मान (वय-४५) रा. खडका रोड भुसावळ हे मोलमजुरी करून आपल्या उदरनिर्वाह करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएम ४५२० ) क्रमांकाची दुचाकी आहे. १७ जानेवारी रोजी सायंकाळी घरी आल्यावर त्यांनी दुचाकी घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे १८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी शेख इकबाल यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदेश निकम करीत आहे.

Protected Content