सात महिला खेळाडूंवर अन्याय अत्याचार; कुस्ती महासंघाचे अध्यक्षांविरोधात निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत देशाला ऑलिम्पिक खेळात तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्तीमध्ये पदक मिळवून भारताचे नाव अजरामर करणाऱ्या सात महिला खेळाडूंसोबत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष यांनी अन्याय अत्याचार केला, त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी, हॉकी व फुटबॉल महिला व पुरुष खेळाडूंनी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारत देशाला ऑलिम्पिक खेळात तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्तीमध्ये पदक मिळवून भारताचे नाव अजरामर करणाऱ्या सात महिला खेळाडूंसोबत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष यांनी अन्याय अत्याचार केला असा आरोप केला आहे. त्यानुसार जळगाव जळगाव जिल्हा विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी, हॉकी व फुटबॉल महिला व पुरुष खेळाडूंनी देखील महिला खेळाडूंना न्याय देण्यात यावा, महासंघाच्या अध्यक्षाला अटक करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी केली.क्रीडा संघटनाचे मार्गदर्शक फारूक शेख यांच्या नेतृत्वात हॉकी व फुटबॉल महिला व पुरुष खेळाडूंनी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना गुरूवार २७ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले.

Protected Content