शिवरायांचा जयघोष न करणारे मलिक राष्ट्रवादीला चालतात का ? : खोपकरांचा सवाल ( व्हिडीओ)

4Nawab Malik 14

मुंबई प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष न करणारे नवाब मलिक राष्ट्रवादीला चालतात का ? असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी विचारला आहे. यासोबत त्यांनी मलिक यांचा हा व्हिडीओदेखील शेअर केला असून यावरून सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहे.

यावरून खोपकर यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. ते अन्य ट्विटमध्ये म्हणतात की, ”आमचे असंख्य मुस्लीम बांधव आहेत, ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की, असं ओरडलं तरी ते आनंदाने जय अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? असा सवाल उपस्थित करण्यात केला आहे. तसेच अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का? या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट ‘जाणता राजा’ संबोधतात, त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आला आहे. दरम्यान, या व्हिडीओमुळे सोशल मीडियात चर्वण सुरू झाले असून नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

खालील ट्विटमध्ये नवाब मलिकचा वादग्रस्त व्हिडीओ दिलेला आहे. तर याच्या खाली अमेय खोपकर यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल करणारे ट्विट दिलेले आहे.

Protected Content