जेवढय़ा चौकशा लावायच्या, त्या लावा : चंद्रकांत पाटील

chandrakant patil

 

सांगली (वृत्तसंस्था) सरकारने मागील कामांच्या जेवढय़ा चौकशा लावायच्या, त्या लावा. पण त्याचे हवाल लवकर जनतेसमोर आणा, चौकशांना आम्ही घाबरत नाही असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. सांगली येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

 

चंद्रकांत पाटील पत्रकार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आत्मनिर्भर होत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास त्यांनी तीन महिन्यांचा काळ घालावयाला नको होता, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. तर आम्ही झोपेत असलो तरी सावधपणे काम केले आहे. यामुळे कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही. मात्र चौकशीचे अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर यावेत ही अपेक्षा आहे. जनहिताचेच निर्णय आम्ही घेतले असल्याने ज्या ज्या प्रकरणाबाबत चौकशी करायची आहे, त्या त्या प्रकरणाची चौकशी सरकारने करावी. चौकशीच्या नावाखाली अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रखडवले असल्याचा आरोप करून ते म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सरकारमध्ये असलेल्या सर्वच नेत्यांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास नसल्याची वक्तव्ये येत असून हे चुकीचे आहे.

Protected Content