यूपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलणे अशक्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । यूपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

कोरोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. यूपीएससी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती. आता ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली.

परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Protected Content