अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । हतनुर धरणावर फिरण्यासाठी घरून निघालेल्या तरूणाचा दुचाकी स्लिप झाल्याने डिव्हायडरवर फेकले गेल्याने डोक्याला मार लागून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश प्रकाश जावरे (वय-२४) रा. तिवारी नगर हा रविवार १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपली दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके ८९३८) दुचाने हतनूर धरणावर जाण्यासाठी एकटा निघाला होता. मोहाडी मार्गाने डी-मार्टकडे जात असतांना छत्रपती गणेश मित्र मंडळ चौकात दुचाकी स्लिप झाल्याने योगेश हा रोडच्या डिव्हायडरवर फेकला गेला. यात डोक्याला गंभीर जखम झाल्याने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान सकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रविवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री उशीरा पोहेकॉ मनोज इंद्रेकर यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content