पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भुसावळला अकस्मात भेट ( Video )

भुसावळ प्रतिनिधी । जिल्ह्याची सूत्रे नुकतीच हाती घेतलेले पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी आज अकस्मात भुसावळ शहरातील पोलीस स्थानकांना भेट देऊन गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.

भुसावळ शहरात अलीकडच्या काळात लागोपाठ खूनाच्या घटना घडल्या असून मध्यंतरी तर गावठी कट्टे सापडण्याचे प्रमाण देखील लक्षणियरित्या वाढल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नेहमीच चिंता व्यक्त करण्यात येत असते. या अनुषंगाने आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी शहर व तालुका पोलीस स्थानकांना भेट दिल्या. यावेळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे दिलीप भागवत उपस्थित होते.

डॉ. मुंडे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. गुन्हेगारीचे निर्दालन करण्यासाठी कुणाचीही गय करता कामा नये, असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला. तर भुसावळातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा देखील त्यांनी घेतला.

खालील व्हिडीओत पहा डॉ. प्रवीण मुंडे नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/351226106230877

Protected Content