व्हॉटस्अ‍ॅपवरुन अफवा पसरविण्याऱ्या तरुणाविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी।  जनमानसांमध्ये भिती निर्माण होवून शांततेचा भंग होईल असे कोरोनाच्या अनुषंगाने अफवा पसरिवणारे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवरुन व्हायरल करणार्‍या  तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख मुबारक शेख जुम्मा पिंजारी वय 34 रा. इंदिरा नगर शिरसोल प्र.बो. असे अफवा पासारविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांना तरुण कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर कुठलीही अफवा पसरवू नये असे आदेश असतांनाही समाजात भिती निर्माण होईल, तसेच शांततेचा भंग होईल असे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवरुन व्हायरल करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरिक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र राठोड, निलेश भावसार, तुकाराम निंबाळकर, ललीत गवळे,  यांना संबधित तरुणाचा शोध घेण्याच्या सुचना केल्या. पथकाच्या चौकशीत शिरसोली प्र.बो. येथील शेख मुबारक याचे नाव निष्पन्न झाले. घरी जावून त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याने अफवा पसरिवणारे तीन संदेश त्याच्या संपर्कातील चार ते पाच जणांना व्हायरल केल्याचे समोर आले. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर आदेशाचे उल्लंघन यासह इतर कलमानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील करीत आहेत.

Protected Content