जिल्हा मूक-बधिर असोशिएशनचे विविध मागण्यांसाठी आंदोलन ! (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जळगाव जिल्हा मूक-बधिर असोशिएशनच्या वतीने मुक व कर्णबधिर दिव्यांगांवर होणारे अन्याय व अत्याचाराविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासह आंदोलन करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या वतीने असोसिएशनचे सल्लागार विजय विसपूते यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात ३ लाख मुकबधिर व्यक्ती आहे. यापैकी ३० हजार साक्षर आहे. मात्र त्यांना इतरांसारखी समान वागणूक मिळत नाही. राज्यात दिव्यांगांच्या नावावर खोटे वैद्यकिय अपंग प्रमाणपत्र बनवून दिव्यांगांच्या सवलती लाटल्या जात आहे. शासकीय रूग्णालयातील डॉक्टरदेखील याला पाठींबा देत आहे. त्यामुळे मुकबधिरांवर अन्याय होत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मुकबधिरांची राखीव जागा असतांना खोट्या लाभधारकांना मिळाल्या असून खऱ्या लाभार्थी यांपासून वंचित राहत आहे.

प्रमुख मागण्या
दिव्यांग महामंडळासाठी व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक लोखधिकारी अशा महत्वाची पदे तत्का भरावीत, कर्णबधिरांसाठी अकरावी व बारावी वर्ग सुरू करावे, शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी विशेष योजना सुरू करण्याची मागणी, शिक्षणासह नोकरीची संधी, विशेष योजनांची माहिती व लाभ दिव्यांगांना मिळावा, गरीब गरजू दिव्यांगांसाठी मुक-बधीरांना हा अर्थीक खर्च अशक्य असल्याने दुभाषीक शिक्षकांसह महाविद्यालय सुरू करावे, १९९५ पासून आतापर्यंत शासकीय नोकर भरतीत खोटे मुक-बधिरांची तज्ञ वैद्यकिय समितीकडून कसून वैद्यकिय तपासणी करावी, मुलींच्या संरक्षणासाठी १०० टक्के महिला कर्मचाऱ्यांची नियुक्तीचे आदेश करावेत. टोलनाका मोफत असावा, दिव्यांगांसाठी दिव्यांग पुरस्कार देण्यात यावा, दिव्यांगांची प्रलंबित न्यायप्रविष्ठ प्रकरणे तत्काळ निकाली लावावी, अश्या मागण्या आहेत.

या निवेदनावर मूक-बधिर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर झंवर, उपाध्यक्ष शरद राठोड, तौसिफ शाह, सहसचिव शशिकांत जोशी, कोषाध्यक्ष भुषण दांडगे, क्रिडा सचिव सचिन पाटील, सदस्य भुषण पाटील, विनोद कोळी, सल्लागार भानुदास जोशी आणि विजय विसपूते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/756149285257498/

 

Protected Content