भिंत पडून लोहार्‍यात बालकाचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा येथे भिंत पडल्याने दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मूळचा बर्‍हाणपूरनजीकच्या पातोंडी येथील रहिवासी असणारा मुजफ्फर आसिफ तडवी (वय १०) हा बालक लोहारा येथे आपल्या मामाकडे आला होता. दरम्यान, रविवारी पहाटे मामाच्या घराची भिंत त्याच्या अंगावर कोसळल्यामुळे मुजफ्फरचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content