बेकायदेशीर दारुसाठा घेवून जाणाऱ्या कारसह दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । संचारबंदीत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तपासणी करण्यासाठी गाडी थांबविली असता, पोलिस कर्मचाऱ्यांना न जुमानता पळण्याच्या प्रयत्नातील व्हीआयपी क्रमांकाच्या कारचा पोलिसांनी पाठलाग करुन चंदू आण्णानगरजवळ पकडले आहे. या गाडीत मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.  याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की, तालूका पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, पांढऱ्या स्वीफ्ट कार मधुन दारुची वाहतुक होत असल्याचे माहिती मिळताच महामार्गावरील निमखेडी टी पॉईंट वर पोलीस कर्मचारी दिपक कोळी व शाम बोरसे अशांना पाठवण्यात आले, इतर ठिकाणी निरीक्षक स्वत: संशयीत वाहनाचा शोध घेत होते. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास (एमएच२४ एएफ १९१९) या नंबरची पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट कार आली. तपासणीसाठी कर्मचारी कोळी व बोरसे यांनी ही गाडी थांबविली. चालकाने पोलिसांना न जुमानता चारचाकी पळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन चंदूआण्णा नगराजवळ ही कार पकडली. यानंतर गाडीची तपासणी केली असता त्यात डीप्लोमॅटच्या मद्याच्या २७० बाटल्या आढळून आल्या. यानंतर कर्मचारी चारचाकीसह चालकाला पोलीस ठाण्यात नेले. स्वीफ्ट कार मधुन दारुची तस्करी करणाऱ्या शुभम साहेबराव पाटिल, आकाश कैलास पाटिल अशा दोघांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरु होती.

Protected Content