मुंबईत तबलिगी जमातच्या १५०जणांवर गुन्हे दाखल

मुंबई वृत्तसंस्था । दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्यांना स्वत:हून समोर येऊन उपचार करून घेण्याचे आवाहन करूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाला तबलिगी जमातचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर तबलिगी हे मुंबईत आले. त्यामुळे मुंबई महापालिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर या लोकांना स्वत:हून स्वत:ची माहिती देण्याचे आणि उपचार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तबलिगींनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांच्यावर अखेर मुबई महापालिकेने आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाऊन सुमारे १५० तबलिगींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे तबलिगींच्या संपर्कातील असून इतर रुग्ण हे केवळ १० टक्केच असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली. मुंबईतील आकडा ५००च्यावर गेला आहे. यातील बहुतेक रुग्ण हे दुबई आणि दिल्लीतील निजामुद्दीन येथून आलेल्यांच्या संपर्कातील असल्याचं परदेशी यांनी सांगितले आहे. वरळी आणि धारावीचा परिसर सील करण्यात आला आहे. येथील ४०० लोकांना पोद्दार रुग्णालय आमि कोळी सभागृहात ठेवण्यात आले आहे.

Protected Content