पुण्यात तीन जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

पुणे वृत्तसंस्था । पुण्यात आज आणखी तिन जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. तिघांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. पुण्यातील मृतांची संख्या आता ८ वर पोहोचली. अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

औरंगाबाद शहरात आणखी तिघे करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये घाटीमध्ये रविवारी मृत झालेल्या करोनाबाधित ५८ वर्षीय बँक अधिकाऱ्याचा ३० वर्षीय मुलगा व २८ वर्षीय सून आणि करोनाबाधित महिलेच्या १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तिघे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आता औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १४ इतकी झाली आहे.

Protected Content