अरे देवा….जिल्ह्यात पुन्हा चार नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसून आज पुन्हा चार रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे रिपोर्टवरून आढळून आले आहे. याबाबत प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात चार नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आज आढळून आलेल्या चार बाधित रुग्णांपैकी भुसावळातील तीन तर जळगाव मधील जोशी पेठेतील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित चार रुग्णांमध्ये 3 पुरुष तर एक महिलेचा समावेश आहे.

आज आढळून आलेल्या बाधित चार रूग्णांपैकी दोन रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रूग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रूग्णाचा दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रूग्ण भुसावळ येथील आहे.

जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले.

यामध्ये चार रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून उर्वरित 48 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित 22 रूग्णांपैकी सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content