राहूल गांधी आता टेलीग्रॅम अ‍ॅपच्या माध्यमातून साधणार संवाद

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी आता टेलीग्रॅम या मॅसेजींग अ‍ॅपवर स्वत:चे चॅनल सुरू केले असून या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

राहूल गांधी हे अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा अतिशय चपखल वापर करतांना दिसून येत आहेत. त्यांचे ट्विटरवर १.४ करोड फॉलोअर्स असून यावरून ते वेळोवेळी आपली मते मांडत आहेत. यासोबत ते आता डिजीटल माध्यमात उपलब्ध असणारे विविध मंच वापरू लागले आहेत. यात फेसबुक, युट्यब आणि इन्स्टाग्रामचा समावेश आहे. यामध्ये आता टेलीग्रॅमची भर पडली आहे. टेलीग्रॅम हे मॅसेजींग अ‍ॅप असून याच्या माध्यमातून अतिशय सुरक्षित पध्दतीत विचार प्रक्षेपीत करता येतात. विशेष करून एकाच वेळी मोठ्या समूहासोबत संपर्क साधण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. राहूल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच टेलीग्रॅम अ‍ॅपवर आपले चॅनल सुरू केले असून याच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे चॅनेल व्हेरिफाय झाल्यानंतर याबाबतची अधिकृत माहिती जनतेला देण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.

Protected Content