मोयगाव येथे सहा तर पहूरला एक कोरोना पॉझिटीव्ह

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या मोयगाव येथील सहा जण तर पहूरच्या एकाला कोरोनाची बाधा असल्याचे आज निष्पन्न झाले आहे. यात पहूर येथील रूग्णाच्या वडिलांनाही आधी कोरोनाची बाधा झालेली आहे.

पहूर पेठ येथे बाधित वडिलांनंतर मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच मोयगाव येथील ६ जणांना तर पहूर पेठ येथील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे. जामनेर तालुक्यातील मोयगाव येथील ५ पुरुष आणि १ महिला अशा ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच पहूर पेठ येथील उभ्या गल्लीवर राहणार्‍या ३० वर्षीय शेतकर्‍याचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. काल त्याच्या ५५ वर्षीय वडिलांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यापाठोपाठ आज मुलाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने चिंता व्यक्त होत आहे पहूर येथील बाधीतांची संख्या आता ३७ झाली आहे.

दरम्यान, पहूर येथील कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी यासाठी उद्या पासून पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून होणार्‍या बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज मात्र बसस्थानक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. तथापि, ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Protected Content