रावेर तालुक्यात १६ नवीन कोरोना बाधीत रूग्ण

रावेर प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपार्टमध्ये तालुक्यामध्ये गत २४ तासांमध्ये एकूण १६ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून प्रशासनाने याला दुजोरा देत त्यांच्या रहिवासाच्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

आज दिवस भरात आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यात सोळा नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सायंकाळसह रात्री आलेल्या रिपोर्टचा समावेश आहे. या रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रावेर तालुक्यात अन्य ठिकाणांच्या तुलनेत थोडा विलंबाने कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी अलीकडच्या काळात दररोज रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात या विषाणूची बाधा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे . या पार्श्‍वभूमिवर शुक्रवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यात सोळा नवीन कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे . यात रावेर शहर सहा; वाघोदा सहा; ख़िर्डी तीन तर कोचुर एक असे रुग्ण आढळले आहे. प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे. दरम्यान , या रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांचा रहिवास असणार्‍या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून त्या भागात फवारणीसह अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत.

Protected Content