यावल येथील मयत महिलेचा शोकाकुल वातावरणात दफनविधी

यावल प्रतिनिधी । येथील विरार नगर परिसरातील वास्तव्यास असणार्‍या व आत्महत्या करून जीवनयात्रा संपविणार्‍या महिलेच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात दफनविधी करण्यात आले.

काल दिनांक ९ जुलै रोजी विरार नगरमध्ये राहणार्‍या सबियाबी इरफान पटेल या महिलेने आपल्या राहत्या घरातील छताला असलेल्या पंख्याच्या हुकला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेत मरण पावलेल्या सबिया पटेल चे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते मरण पावलेल्या सबिया पटेल चे वडील गफ्फार मजीत देशमुख सुरत गुजरात येथून मध्यरात्री यावल येथे आपल्या कुटुंबासह पोहोचल्यावर अखेर त्या आत्महत्या केलेल्या विवाहितेची अंत्ययात्रा अत्यंत शोकाकूल वातावरणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. रात्री एक वाजेच्या सुमारास त्या महिलाचा दफनविधी कबरस्थानात करण्यात आला.

Protected Content