नवी दिल्लीः वृत्तसंस्था| आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटच्या महिन्यात जीएसटी संकलन 1.23 लाख कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर त्यात 27 टक्क्यांची वाढ नोंदली गेलीय, अशी माहिती वित्त मंत्रालयाने दिलीय.
गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी संग्रह 1 लाख कोटींच्या पुढे गेलाय आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक हालचाली वेगाने सुधारत आहेत, ज्यामुळे जीएसटी संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.
मार्च 2021 मध्ये एकूण जीएसटी संग्रह 123902 कोटी रुपये होते. त्यापैकी केंद्रीय जीएसटी 22973 कोटी रुपये, राज्य जीएसटी 29329 कोटी आणि इंटिग्रेटेड जीएसटी 62842 कोटी रुपये आहे. जीएसटी सुरू झाल्यापासून मार्च महिन्यात जीएसटी संकलन सर्वाधिक झाले. मार्च 2020 मध्ये ते 97590 कोटी रुपये होते. यावर्षी जानेवारीत जीएसटी संग्रह 119875 कोटी रुपये होता आणि फेब्रुवारीमध्ये तो 113143 कोटी रुपये झाला होता.