साखरपुड्यात नियमांचे उल्लंघन; हॉटेल मॅनेजरवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी ।  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी शासकीय आदेशानुसार मोजक्या उपस्थितीत साखरपुडा कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातच्या जवळ असलेल्या हॉटेल पॅरॅडाईजमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३१ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना अजिंठा रोडवरील  हॉटेल प्रेसिडेन्ट मधील हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार तुकाराम निंबाळकर, पो.ना. ललीत गवळे यांनी जावून पाहणी केली असता साखरपुडाच्या कार्यक्रमात ३० ते ३५ जणांची उपस्थिती दिसून आली. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर दिनेश मधुकर धुटे (वय-४३) रा. गुजराल पेट्रोलपंप जळगाव यांच्यावर पोहेकॉ विश्वास बोरसे यांच्या फिर्यादीवरून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग व कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार करीत आहे. 

 

Protected Content