इस्त्रोने ‘चांद्रयान-3’ची तयारी केली सुरू

chandrayaan 2 201908289036

 

बेंगळुरू वृत्तसंस्था । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता “चांद्रयान-3” या मोहीमेच्या तयारीला लागले आहे. काहीच दिवसांपूर्वी इस्रोने चांद्रयान-2 ही मोहीम राबवली असून अपेक्षित यश न मिळाल्याने इस्त्रोने चांद्रयान-3 च्या तयारीस प्रारंभ केला आहे. चांद्रयान-3 च्या लँचिंगसाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

पुढील वर्षी म्हणजे 2020मध्ये इस्रो चांद्रयान-3 ही मोहीम राबवणार आहे. इस्रोमधील वैज्ञानिक सध्या चांद्रयान-3च्या तयारीला लाग आहेत. यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारण या मोहिमेसाठी आवश्यक असलेले लँडर, रोवर, रॉकेट आणि इतर उपकरणे बनवायला व त्यांना विकसित करायला अधिक अवधीची गरज लागणार आहे. चांद्रयान-2 मोहीमेप्रमाणे यात ऑर्बिटर असणार नाही. या मोहीमेसाठी चांद्रयान-2च्या ऑर्बिटरचा वापर केला जाणार असल्याचे समजते. हा ऑर्बिटर सात वर्षे काम करणार आहे. चांद्रयान-3 मोहीमेत लँडरचे पाय अधिक मजबूत केले जाणार आहेत.

इस्त्रोच्या अहमदाबाद येथील केंद्रातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या कुठल्याही उपकरणाला तयार होण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यानुसारच चांद्रयान-3साठी लागणाऱ्या उपकरणांवर तीन वर्ष संशोधन केले जाणार आहे. त्यानंतर त्याचे डिझाईन तयार केले जाईल. नंतर त्या उपकरणाच्या विकासावर काम केले जाईल. चांद्रयान-3 च्या लँडरमध्ये चार आणि रोवरमध्ये 2 जुने उपकरणंही बसवण्यात येणार आहेत. ही सर्व उपकरणं विकसित करण्यास कमीत कमी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे.

Protected Content