‘मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा की शोभायात्रा’, अमृतराव महाजन यांची टिका

Devendra Fadnavis 1

चोपडा प्रतिनिधी । गुरुकुंज मोझरीतून निघालेली मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा दि. ८ ऑगस्ट रोजी जळगावात येणार म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविकांचे गेल्या 3 ते 4 महिन्यापासुन थकित वेतनश्रेणी मिळावी, याबाबतचे निवेदन देण्याची कॉ. अमृत महाजन यांचे नेतृत्वात जळगाव जिल्हा आयटकच्या वतीने केवळ इच्छाच व्यक्त करण्यात आली होती. मात्र, जळगाव पोलीसांनी ग्रा.पं.कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या 2 ते 3 महिन्यापासुन थकित पगार मिळावा यासाठी त्यांना निवेदन द्यावे, असे धरणगाव तालुक्यातील कर्मचारींचा मेळाव्यात निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांचेही निवेदन देण्याचे 6 ऑगस्ट रोजीच ठरले आहे. म्हणून कामगार नेते अमृत महाजन यांचे नेतृत्वात राजेंद्र कोळी, रमेश पाटील, सतिष पाटील, जिजाबराव पाटील, गोपाल कोली यांनी धरणगाव पोलीस स्टेशन गोपनिय शाखेत अर्ज दिला. त्यांनी 2 तास थांबवून वरिष्ठाचे मार्गदर्शन घेऊन 5 ही जणांना डिटीपी केलेल्या व वरिष्ठांचे सहीच्या नोटीसावर सह्या घेतल्या व त्या त्यांचेकडेच ठेऊन घेतल्या. नोटीमध्ये जमावबंदी लागू आहे. मुख्यमंत्र्यांचे जीवास धोका होईल असे वागू नये, कायदा सुव्यवस्था स्थेला बांधला आहे. काही झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल म्हणून कायद्यानूसार कारवाई केली अशी तंबी लिहिली आहे. तसेच तोंडी सल्ला देण्यात आला की, आपण एस.पी. ऑफिसला परवानगी मागावी, असे सांगून गोपनिय शाखेच्या कर्मचा-यांनी अर्ज परत केला आहे.

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत आहेत की, शोभायात्रा काढत आहेत ? अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते व आयटकचे राज्य उपाध्यक्ष अमृतराव महाजन यांनी केली आहे. त्यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमच्या सारखेचे अनेक कर्मचारी नागरिक यांनी जिल्ह्य़ात मूख्यमंत्री येत आहेत त्यांना निवेदन देऊन आपले प्रश्न मांडले तर सुटतील ही भाबडी अशा बाळगली तर त्यांना मूख्यमंत्री भेटणे आधी “अग्निदिव्या”त घालणे म्हणजे मूख्यमंत्रीजी निशस्त्र गरिबांनाही भीत असतील महाजनादेश यात्रेचा अर्थ काय ?

याचे उत्तर देण्याबरोबर कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडात आरोपींना शिक्षा होईल काय ?, शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळतील का ? अंगणवाडी ग्रा.पं.कर्मचारीचे थकित पगार वेतन मानधनवाढीचा निर्णय कधी घेणार? त्यांची आर्थिक कोंडी कधी सूटतील? लोकांना वीज मीटर बदलून फास्ट फिरणारी विज मीटर जात आहे. हजारो रूपये बील येत आहे, याला जबाबदार कोण ? असे प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री यांनी देणे आवश्यक आहे. असे कॉ. महाजन यांनी म्हटले आहे.

Protected Content