हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले

hatnur dharan

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र पूर्ण भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून 91549 क्युसेक्स वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 

 

मध्यप्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या आसपास झालेल्या पावसाचा फायदाही हतनूर धरणाला झाला. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे आता धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सकाळी दुपारी ११ वाजेपर्यंत धरणाचे 3० दरवाजे उघडण्यात आले होते. प्रति सेकंद जवळपास91549 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या धरणातून सुरु होता. दरम्यान, जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील तापी नदीच्या उगमस्थानी झालेल्या जोरदार पावसाने हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र पूर्ण भरले आहे. दरम्यान, हे पाणी प्रकाशामार्गे सुरतच्या उकई डॅम पर्यंत जाते.

Protected Content