सामाजिक न्याय विभागाची ‘लिंग संवेदना’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराट्र विदयापीठ, जळगाव येथे समाजशास्त्र प्रशाळा, समाजकार्य विभाग, व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 फेब्रुवारी, 2024 रोजी लिंग संवेदना या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेत श्रीमती शमिभा पाटील यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विनोद पाटील हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, यांनी आपले मत व्यक्त करतांना तृतीयपंथीय व्यक्तींच्या लिंग संवेदना याबाबत मार्गदर्शन करतांना लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो असे मत व्यक्त केले. तसेच कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जीवन जगण्याचा दृष्टीकोन व अपेक्षा विषयी तृतीयपंथीयांना देखील इतर माणसांप्रमाणे जीवन जगण्याचे अधिकार आहेत असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने तृतीयपंथीय व्यक्ती उपस्थित असून त्यांचेसह समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी प्रा. डॉ. दिपक सोनवणे यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री. महेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगेश माळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डिगंबर सावंता यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभाग, समाजशास्र प्रशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील प्राध्यापक व कर्मचारी, समाजकल्याण विभागाचे श्री. राहुल पाटील, श्री. किशोर माळी, श्री. चेतन चौधरी, श्री. राहुल महाले, श्री.अक्षय साबळे, श्री. अनिल पगारे, श्री. जितेंद्र धनगर आदींनी प्रयत्न केले. असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content