शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकनुकसानीची भरपाई मिळावी; तहसीलदारांना निवदेन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पातोंडा आणि त्यांच्या लगतच्या परिसरात २६ फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्या संदर्भात सदर पंचनाम्याचे निवेदन तहसीलदार यांना देताना परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते त्याप्रसंगी पंचनामे करण्याबाबत अनिल पाटील मंत्री मदत व पुर्नवसन आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मुंबई यांनी सुचित केल्या नुसार तात्कालिक शेतक-याना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिति सदस्य सौ रिता ताई बाविस्कर यांनी नायब तहसीलदार साहेबांना विनंती केली.

त्याप्रसंगी एल.टी.पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, शिवाजी पाटील, सुरेश पाटील, धनगर पाटील, मनोज पाटील, विकास सोसायटी पातोंडा चेअरमन सुनिल पवार, जितेंद्र पवार, राहुल पवार, राहुल लंबोळे, हर्षल पवार, संजय पवार, दिपक पवार, भोजराज पाटील, आंना पाटील, आर.डी.पवार सर, जयवंतराव पवार, भरत बिरारी, विजय पवार, भूषण पवार, पांडुरंग बोरसे इत्यादी शेतकरी हजर होते

Protected Content