वादग्रस्त पुस्तकावर त्वरित बंदी घाला, अन्यथा आंदोलन : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

jal

जळगाव प्रतिनिधी । “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या वादग्रस्त पुस्तकावर तात्काळ बंदी घाला आणि लेखक व प्रकाशन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे निवासी जिल्हाधिकारी वामन कदम यांना देण्यात आले असून यावर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी पक्षातर्फे देण्यात आला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१२ जानेवारी रोजी संपूर्ण जगाचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या पुस्तकातून भारतीय जनता पार्टी पदाधिकारी जय भगवान गोयल या नालायक बेशरम माणसाने पुस्तक लिहून पुस्तक भाजपा कार्यालयातून प्रकाशित केले. या पुस्तकाचा लेखकाचा व भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी यवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तुत्व हिमालायापेक्षा उंच असून जगातील कोणत्याही व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होऊच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करून जय भगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. महाराजांचे विचार व कार्य इतके महान आहे. त्यांची तुलना कोणाशीही होऊच शकत नाही. त्यासाठी भाजपाच्या या नालायक बेशरम जय भगवान गोयल याने लिहिलेले पुस्तक त्वरित मागे घेऊन, त्यावर बंदी घालावी. व पुस्तकाचे
लेखक व प्रकाशक यांच्यावर कठोर कारवाही करण्यात यावी, कारण, संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शिवप्रेमींचा अपमान झालेला असून या रोषाला सामोरे जावे लागेल. तरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.

निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, माजी युवक कार्याध्यक्ष.ॲड कुणाल पवार, न्यानेश्वर पाटील, किशोर खोडपे, नाटेश्वर पवार, जितेंद्र सरोदे, राज कोळी, राजेंद्र चौधरी, योगेश नरोटे, दरबार राठोड, महेश मराठे, शंकर पाटील, कामरान शेख, अजुरुद्रिन शेख, लिलाधर चौधरी आदि मंडळी उपस्थित होते.

Protected Content