Home क्राईम मुक्ताईनगरात वादग्रस्त पुस्तकाचा मुस्लिम समाजातर्फे तिव्र निषेध

मुक्ताईनगरात वादग्रस्त पुस्तकाचा मुस्लिम समाजातर्फे तिव्र निषेध

0
119

Muktainagar1

मुक्ताईनगर प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना करणाऱ्या जयभगवाण गोयल यांच्या विरोधात मुक्ताईनगरातील मुस्लिम समाजतर्फे निषेध व्यक्त करून लेखक भगवान गोएल यांचेवर कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मुस्लिम बांधवांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, दिल्लीत झालेल्या संत संमेलनात “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” नावाचे पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील भाजपचे नेत्याचे उपस्थित नुकतेच प्रकाशन करण्यात आले. भाजपचे नेते जय भगवान गोएल यांनी हे पुस्तक लिहिले आहे,या पुस्तकात महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेले व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बरोबर भाजपचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तुलना केल्याने भाजपचे नेते जय भगवान गोएल यांचे वर कडक करवाई करावी व त्यांच्या ह्या भोर कृत्य मुळे भारतातील सर्व शिव छत्रपती शिवाजी महाराज वर प्रेम करणाऱ्या बांधव चे भावना दूखल्या गेल्याने आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधव यांचा तिव्र निषेध करीत असून सदर पुस्तकाचे लेखक भगवान गोएल यांचेवर कडक कार्यवाही व्हावी व पुस्तकांचे प्रकाशन त्वरित थांबावे असे निवेदन देण्यात आले.


Protected Content

Play sound