ढाका वृत्तसंस्था । दहशतवाद प्रकरणी फ्रान्सच्या भूमिकेचे एका हिंदू व्यक्तीने स्वागत केल्यामुळे बांगलादेशात अनेक हिंदू समुदायातील लोकांची घरे जाळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बांगलादेशमधील कोमिला प्रांतातील मुरादनगर जिल्ह्यातील कोरबनपुर गावामध्ये स्थानिक यूनियन परिषदेचे अध्यक्ष बनकुमार शिव यांचे कार्यालय आणि विरोधी प्रतिक्रिया देणार्या शंकर देबनाथच्या घराला आग लावली. त्याचबरोबर या भागातील दहा हिंदू कुटुंबियांवर या जमावाने हल्लाही केला. गावातील शंकर देबनाथ याने फ्रान्ससंबंधित एका फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. या पोस्टमध्ये प्रेषित महंमद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणार्या फ्रान्सला विरोध करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आलं होतं. या पोस्टवर शंकरने प्रतिक्रिया देताना फ्रान्सचे समर्थन केलं. तसेच पैगंबरांवरील व्यंगचित्र योग्य असल्याचं म्हटलं होतं.
याचमुळे स्थानिक हिंदू समुदायातील लोकांच्या घरांना आग लावण्याचे प्रकार घडले. यामुळे अल्पसंख्यांक हिंदू समुदायामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याचरप्रमाणे धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी पोलिसांनी शंकर देबनाथ आणि अनिक भौमिक नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.