देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ

 

नवी दिल्ली । सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी म्हणजेच सीएमआयईने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर ६.९८ टक्के एवढा होता. तर सप्टेंबरमध्ये हाच दर ६.६७ टक्के होता. कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. परिणामी बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बेरोजगारीचा सर्वाधिक दर एप्रिलमध्ये २३.५२ टक्के होता. त्यानंतर मे मध्ये त्यात थोडी घट झाली होती. सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केल्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात बर्‍यापैकी घट झालेली आकडेवारीत दिसून आले. मात्र यानंतर पुन्हा ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी वाढल्याचे दिसून आले आहे.

अनलॉकफनंतर आर्थिक व्यवहार वाढले असून ऑक्टोबरमध्ये विक्रमी जीएसटी संकलन झाले. यामुळे यापुढे बेरोजगारीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

Protected Content