दहीवद येथील रस्त्याच्या कामाचे आ. अनिल पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील  दहिवद ते दहिवद फाट्यापर्यंत रस्त्या गेल्या अनेक महिन्यांपासून खराब झाला होता. रस्त्याच्या कामाला निधी मंजूर केल्यानंतर आ. अनिल पाटील यांच्याहस्ते रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले.

 

याबाबत माहिती अशी की, दहिवद हे तालुक्यातील मोठे गाव असताना गेल्या ४-५ वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असल्याने येथून जाताना ग्रामस्थांची कसरत होत होती. यामुळे आमदारांनी हा प्रश्न मनावर घेऊन निधी मंजूर करून आणल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

 

आमदार अनिल पाटलांच्या भूमिपूजन प्रसंगी सरपंच सुषमा देसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष देसले, माजी जि.प. सदस्य अशोक पाटील, जयवंत पाटील, मार्केटचे प्रशासक सदस्य एल. टी पाटील, उपसरपंच बाळू पाटील, माजी उपसरपंच सुनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पारधी, वर्षा पाटील, रेखाबाई पाटील, रवींद्र माळी, दत्तात्रय देसले, गोकुळ माळी, किशोर पाटील, सुकलाल पारधी, बापू सोनवणे, भिला नाना, संजय देसले, ईसवर माळी, भुषण भदाणे, गुलाब पाटील, बापू पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, दिलिप पाटील, ज्ञानेश्वर  पाटील, भानुदास लोहार, दिलीप माळी, भाऊराव पाटील, स्वप्निल पाटील, नरसिंह देसले, सुधाकर पाटील, आनंदा पाटील, राजेंद्र पारधी, भिकन सोनवणे, राहुल माळी, बाळू सोनार, नाना पाटील, पंडित पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content