जळगाव जिल्ह्याचा अनोखा विक्रम : जाणून घ्या पूर्ण माहिती

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना जारी होताच जळगाव जिल्ह्याने राज्यात एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. जाणून घ्या याबाबतची पूर्ण माहिती…!

आज सायंकाळी नशिराबाद येथे नगरपरिषद अस्तित्वात आल्याची अधिसूचना निघाली. खरं तर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच याबाबतचे संकेत दिले होते. या पार्श्‍वभूमिवर आज नशिराबाद येथील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नगरपरिषद अस्तित्वात आली आहे. यासोबत जळगाव जिल्ह्याने एक अनोखा विक्रम नोंदविला आहे.

जिल्ह्यात आजवर जळगाव येथे महापालिका तर भुसावळ, सावदा, फैजपूर, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, चोपडा, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, धरणगाव, वरणगाव, जामनेर, चाळीसगाव नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती कार्यरत होत्या. नशिराबाद ही जिल्ह्यातील विसावी नागरी स्वराज्य संस्था बनली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरी स्वराज्य संस्था असणारा जळगाव हा राज्यातील पहिला जिल्हा बनला आहे. यामुळे नागरी स्वराज्य संस्थांचा एक अनोखा विक्रम जिल्ह्याच्या नावावा नोंदविण्यात आलेला आहे.

 

Protected Content