अज्ञात कारच्या धडकेत प्रौढ जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील कानळदा रोडवरील रेणूकामाता मंदीराजवळ मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका प्रौढाला भरधाव कारने धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना गुरूवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजून २५ मिनीटांनी घटली. याप्रकरणी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात कारवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सुधीर उत्तम सोनवणे वय-४५ रा. गेंदालाल मिल, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे गुरूवारी ४ जानेवारी रोजी सकाळी त्याचे मित्र अरूण निकम यांच्यासोबत कानळदा रोडवरून मॉनींग वॉक करण्यासाठी निघाले होते. सकाळी ५ वाजून २५ मिनीटांनी रेणूका माता मंदीराजवळून पायी जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुधी सोनवणे यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय झाल्टे हे करीत आहे.

Protected Content