महापालिकेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ जणांवर दंडात्मक कारवाई

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करत सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क, रुमाल न वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे आदींचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ९ जणांवर आज महापालिकेच्या प्रभाग समिती क्र. ४ च्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.

आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज मंगळावर २८ एप्रिल रोजी प्रभागसमिती क्र. ४ मध्ये सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क, रुमाल न वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे आदींचे उल्लंघन करणारे ९ जण आढळून आलेत. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे एकूण ४ हजार ५०० दंड आकारण्यात आला. यात महाबळ कॉलनी,  एम. जे. कॉलेज, गिरणा टाकी,  एस.एम.आय.टी. परिसरातील विक्रेत्यांवर दंडाची आकारणी करण्यात आलेली आहे.  यात अनिल नर्सरी,  चर्च रोड,  प्रवीण पाटील,  विकास दुग्धालय, डीएसपी चौक,  विकास झोपे,  विकास दुध, महाबळ रोड,  जोशी फ्रुट सेंटर,  मायादेवी नगर, शिव डेअरी,  महाबळ रोड, प्रसाद प्रोव्हिजन, महाबळ रोड, अनिकेत चौधरी, दिशा नीड्स, सुशील किराणा, एसएमआयटी रोड, अग्रवाल मेडिकल, एसएमआयटी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रभाग अधिकारी उदय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास बेंडाळे, सुनील भट ,चेतन हातागळे, मुकादम दीपक भावसार, वालीदास सोनवणे, इमरान भिस्ती, शंकर अंभोरे, विशाल हातागळे आदींनी केली.

Protected Content