जळगावच्या विद्यापीठात २ अध्यासन केंद्रांच्या मंजुरीची घोषणा

जळगाव प्रतिनिधी । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संत मुक्ताई संत साहित्य अध्यासन केंद्र आणि बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्र स्थापनेचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे , अशी घोषणा आज जळगावात उच्चं व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. विद्यापीठातील बैठकीनंतर पत्रपरिषदेत त्यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्शवभूमीवर या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चं व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज जळगावात आले होते . त्यांनी सांगितले कि परीक्षांच्या धोरणानुसार तयारी झाली असून एकूण विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत . अपवादाच्या परिस्थितीतील उर्वरित १० टक्के विदयार्थ्यांच्या परीक्षा त्यांच्या आहेत. परीक्षा देताना एकही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सहकार्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे . सर्व प्रश्नसंच तयार आहेत.

नापास विद्यार्थ्यांना पुन्हा ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात परीक्षेची संधी दिली जाणार आहे . राज्य सरकारकडून विद्यापीठाला सहकार्य मिळेल . या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल काहीही भीती बाळगू नये . प्रमाणपत्राबद्दल काही त्रास देणारी भूमिका उदयोगांकडून किंवा कोणत्याही संस्थेकडून घेतली गेली तर त्यांच्यावर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात येईल. संत मुक्ताई संत साहित्य अध्यासन केंद्र आणि बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळा च्या यापुढच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल असेही उच्चं व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

Protected Content