दुचाकी चोरीच्या गुन्हेगाराकडून तीन दुचाकी हस्तगत

MIDC Police news

जळगाव प्रतिनिधी । अंगणात पार्कींगला लावलेली दुचाकी चोरीप्रकरणातील एकास अटक केली असून त्यांच्याजवळील तीन दुचाकी हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलीसात यश आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अझरूद्दीन निजामोद्दिन शेख वय-29 रा. दत्त नगर, मेहरूण यांची दुचाकी क्रमांक एमएच 19 एटी 3886 यांची 14 जानेवारी रोजी रात्री 7 वाजता घरासमोर दुचाकी पार्किंग केली होती. रात्री 11.30 वाजता पार्कींग केलेली दुचाकी मिळून आली नाही. परीसरात इतरत्र शोधाशोध करूनही मिळून न आल्याने त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून एमआयडीसी पोलीसांनी गुप्त माहितीनुसार सहाय्यक फौजदार रामकृष्‍ण पाटील, विजय पाटील, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी सैय्यद सुलतान उर्फ बबलु शब्बीर अली रा. पाढेगाव ता.जि. औरंगाबाद येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातील चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केली आहे. दरम्यान त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content