दहावीच्या परीक्षेत साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे यश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल येथील साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या शालांत परिक्षेचा निकाल लागला असुन यंदाच्या परिक्षेत विद्यालयात मुलांनी आघाडी घेतली आहे.

 

दहावीच्या शालांत परिक्षेचा निकाल लागला असुन साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन २०२२-२०२३ या वर्षातील मार्च २o२३ च्या एसएससी परीक्षेमध्ये साने गुरुजी विद्यालयाचा  निकाल ८९.८९ टक्के लागला. पाटील तपस्या चुडामन प्रथम क्रमांक ९३ .२० % गुण तर चौधरी केतन राजेन्द्र ९२ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक व नाथजोगी कृष्णा संजय आणि धनगर प्रमोद मुरलीधर यांनी ९० .२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे.

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे माजी शालेय समिती अध्यक्ष अतुल पाटील तसेच सर्व माजी नगरसेवक, मुख्याध्यापक  एम के पाटील सर उपप्राचार्य ए एस इंगळे पर्यवेक्षक  व्ही ए काटकर, व्ही टी नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबदल त्यांचे अभिनंदन केले त्यांच्या यशामध्ये सहकार्य करणाऱ्या कुटुंब व शिक्षक -शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी ही  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Protected Content