खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवस : जळगावात विविध सामाजिक कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नेत्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव महानगर राष्ट्रवादी पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

महात्मा गांधी वाचनालय येथे  येथे अकरा हजार रुपयांची पुस्तके भेट देण्यात आली तसेच पार्वतीनगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. जळगांव शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना फेसशिल्ड आणि सँनिटायझर वाटप करण्यात आले तसेच घरकामगार महिलांचा सुरक्षाकवच म्हणून १ लाख रुपयांचा विमा करण्यात आला.

यावेळी उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कल्पनाताई पाटील, जळगांव चे महानगराध्यक्ष अभिषेकभाऊं पाटील, सचिव ॲड.कुणाल पवार, राष्ट्रवादी युवक महानगराध्यक्ष स्वप्निल नेमाडे, सरचिटणीस फिरोज शेख , हुसेन बाबा, सामाजिक न्याय विभागाचे महानगराध्यक्ष जितेंद्र चांगरे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव लवंगे, अल्पसंख्यांक सेलचे  अध्यक्ष रिजवान खाटीक, महानगर युवक उपाध्यक्ष पंकज बोरॉले, महानगर सरचिटणीस ममता तडवी, सरचिटणीस सौ.अर्चना कदम, महानगर चिटणीस सौ.आशाताई अंभुरे ,  सौ.मगरताई, श्रीमती उज्वलाताई शिंदे , कमल ताई पाटील , आरती राजपुत,कामगार संघटनेचे शहराध्यक्ष सतिष सुर्वे, वक्ता सेलचे शहराध्यक्ष रमेश भोळे, जळगांव शहर युवती अध्यक्ष आरोही नेवे,उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्षा दिव्या भोसले, युवती कार्याध्यक्ष कोमल पाटील, , युवती शहर चिटणीस पायल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content