आम्ही पाच वर्षात करुन दाखवले : निर्मला सीतारामन

nirum 201907263028

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली. सन 2014 मध्ये 1.85 खरब डॉलर असलेली अर्थव्यवस्था 2.7 खरब अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर पुढील काही वर्षात हीच अर्थव्यवसथा 5 खरब डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे उद्धिष्ट असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, हे ५५ वर्षात झाले नाही. ते आम्ही ५ वर्षात करून दाखविले, असेही सीतारमन यांनी सांगितले.

 

देशाचे बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना सुरुवतालीच हिंदीत शेर मारला. भारतीय अर्थव्यवस्थेतेतील सकरात्मक बदल आणि देशाचा आर्थिक विकास याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सितारमण यांनी सभागृहात भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी, ”यकीन हो तो कोई रास्‍ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है”, असे म्हणत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी एक ट्रिलयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यास ५५ वर्ष लागली, पण आम्ही फक्त पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलर्स त्यात जोडले असे सांगितले. यावेळी निर्मला सीतारामन यांनी पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला. तसेच या वर्षातच तीन ट्रिलियन डॉलरचं लक्ष आपली अर्थव्यवस्था गाठेल असेही सांगितले. पाच वर्षांपुर्वी भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. पण आता भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करताना जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिले. भारताच्या प्रगतीचा अर्थसंकल्प आहे. नव्या भारताचा हा अर्थसंकल्प आहे, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. स्थिर आणि प्रगतीशील भारतासाठी हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. लोकांनी दिलेल्या जनमताच्या आधारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही आमचे ध्येय गाठणार असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Protected Content