आता आम्ही मनाने एक झालो आहोत : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

गांधीनगर (वृत्तसंस्था) आमच्यामध्ये मतभेद नक्की होतो, मात्र आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मनाने एक झाले आहे, दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरचे भाजपचे उमेदवार अमित शहा यांना शुभेच्छा दिला. एनडीएच्या गांधीनगरमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरे संबोधित करत होते. मी इथे कसा असा अनेकांना पश्न पडला असून गांधीनगरला आल्याने अनेकांच्या पोटात दुखतंय अशा शब्दांत ठाकरे यांनी विरोधकांना टोला हाणला आहे. तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन गांधीनगरमधील मतदारांना केले आहे.

 

भाजपाध्यक्ष अमित शाह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली. त्याआधी आयोजित विजय संलल्प सभेत घटकपक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता.मी येथे कसा काय आलो याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अनेकांच्या पोटात दुखत आहे. त्याचा इलाज आमच्याकडे आणि तुम्हा मतदारांकडे आहे’, असे सांगत मी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावत आम्ही एकमेकांशी भांडत असल्याचा अनेकांना आनंद होत होता. आमच्यात मतभेद नक्की होते, पण भेट झाल्यानंतर सगळे मिटले आहेत. सर्व वाद आम्ही संपवले आहेत असेही ठाकरे यांनी सांगितले आहे.

Add Comment

Protected Content