अमळनेर शहरात पोलीसांचे पथसंचलन

अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यात व इतर आजूबाजूच्या परिसरात कोणताही अनुचित अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाने अमळनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरात पथसंचलन करण्यात आले.

यावेळी ७ अधिकारी व ७० कर्मचारी हजर होते. अमळनेर शहरात व तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमळनेर पोलीस सज्ज आहेत. अमळनेरचे डीवायएसपी राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व सहकारी कर्मचारी वर्गाने शहरातील काही महत्त्वाच्या भागातील माहीती जाणून घेतली. निवडणुकीपूर्वी व निवडणुकीच्या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अमळनेर पोलीसाकडून पुर्ण तयारी करण्यात आली आहे. अमळनेर मारवड पारोळा, एरोंडल या पोलिस ठाण्याअंतर्गत एकुण ५० पोलीस व आरसीएफचे २० कर्मचारी व ८ अधिकारी यांचा समावेश होता.

Add Comment

Protected Content