भरधाव डंपरचा बळी : तरसोद फाट्याजवळ अपघातात महिला ठार

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दुपारी घडली.

अवैध वाळू आणि गौणखनिजाचा जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात उपसा आणि वाहतूक सुरू असून हे डंपर आणि ट्रॅक्टर चालक अक्षरश: भरधाव वेगाने धावत असल्याने अनेक अपघात होत आहेत. असाच एक अपघात तरसोद फाट्याजवळ झाला आहे. एमएच १९ वाय-७७७३ क्रमांकाच्या डंपरने आज एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली असून एक जण जखमी झालेला आहे.

दरम्यान, मृत महिला ही कंडारी ता. भुसावळ येथील असून तिचे नाव प्रेरणा देविदास तायडे असल्याची माहिती समोर आली आहे. तर, या अपघातामुळे अवैध वाळू वाहतुकीवर निर्बंध कधी येणार हा प्रश्‍न विचारला जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामुळे अवैध वाळू आणि गौणखनिज वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Protected Content